यामुळे भोसरी पोलिसांवर आली बकऱ्या संभाळण्याची वेळ…

461

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – चोरीला गेलेल्या ३२ शेळ्यांचा शोध भोसरी पोलिसांनी लावला आहे. मात्र, न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत  त्यांच्यावर या शेळ्या सांभाळण्याची वेळ आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर नामा काळे (वय ७८, रा. कचरा डेपोजवळ, कॅन्टोमेंट चाळ, कासारवाडी) यांच्या ११ बकऱ्या बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास चोरीला गेल्या होत्या. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर भोसरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आसपासच्या परिसरात शेळ्या चोरणाऱ्या व्यक्‍तींबाबत माहिती घेतली असता खडकी येथील एका आरोपीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता चार जणांनी शेळ्या चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले असून चोरलेल्या ११ बकऱ्यासह एकूण ३२ बकऱ्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आखाड महिन्यात मटणाला जादा मागणी असल्याने आरोपींनी या बकऱ्या चोरल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत जप्त करण्यात आलेल्या ३२ शेळ्यांचा संभाळ भोसरी पोलिसांना करावा लागणार आहे. यामुळे त्यांची चांगलीच दमछाक झालेली दिसली.