यापुढे कोणतीच निवडणूक लढवणार नाही – चंद्रकांत पाटलांची घोषणा

1527

कोल्हापूर, दि. ६ (पीसीबी) – यापुढे कोणतीच निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (गुरूवारी) येथे केली. मला ना लोकसभा, ना विधानसभा, ना पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची. मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

कोल्हापुरात ‘गणराया’ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात पाटील बोलत होते.

सध्या चंद्रकांतदादा सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत व पुनर्वसन अशा खात्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी आपली सार्वजनिक आयुष्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अभाविपच्या माध्यमातून केली. २००४ साली भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी सक्रीय राजकारणाला सुरूवात केली.

२०१३ मध्ये ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. २०१४ मध्ये ते विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. सध्या त्यांच्याकडे तीन महत्त्वपूर्ण खाती आहेत. राज्य मंत्रिमंडळात दोन नंबरचे मंत्री म्हणून ते ओळखले जातात.