यशस्वी प्राथमिक माध्यमिक इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये ७१ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात पार

237

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) – प्राथमिक माध्यमिक इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये ७१ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात पार पडला. ध्वजारोहण मा. नगरसेवक धनंजय आल्हाट यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्राथमिक माध्यमिक इंग्लिश मिडीयम स्कुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते व विद्यालयाच्या मुख्यध्यापिका शोभा देवकाते, डॉ. तुषार देवकाते, नगरसेवक लक्ष्मणशेठ सस्ते, मा.नगरसेवक धनंजय आल्हाट, सुरेश सुर्यवंशी, ए.पी.आए बाळासाहेब शिंदे, पोलिस निरीक्षक दरेकर, पोलिस निरीक्षक पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. स्वागतगीत म्हणून प्रमुख पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले.

WhatsAppShare