यशवंतनगर येथे पायी घरी निघालेल्या वृध्दाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

101

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – रस्त्याने पायी घरी निघालेल्या एका ६५ वर्षीय वृध्दाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.७) सायंकाळी सातेसातच्या सुमारास यशवंतनगर येथील सुंदर विठ्ठल निवास समोरील रस्त्यावर घडली.

अर्जुन ज्ञानदेव किरदकरवे (वय ६५, रा. अण्णासाहेब मगर स्टेडीयम मागे, यशवंतनगर, पिंपरी) असे मयत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शिवराम अर्जुन किरदकरवे (वय २४, रा. अण्णासाहेब मगर स्टेडीयम मागे, यशवंतनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सातेसातच्या सुमारास अर्जुन किरदकरवे हे यशवंतनगर येथील सुंदर विठ्ठल निवास समोरील रस्त्यावरुन पायी घरी निघाले होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहनचालकाने अर्जुन यांना जोरदार धडक दिली. यामध्ये अर्जुन यांचा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक हरिदास बोचरे आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.