यमुनानगर येथील बिअर बारवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद

0
1235

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – बिअर बारवर दरोड्याच्या तरीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला चिखली पोलीसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई रविवारी (दि.२) रात्री उशीरा पावनेएकच्या सुमारास त्रिवेणीनगर येथील राम मंदिराच्या आवारात करण्यात आली.

शुभम नितीन काळभोर (वय १९, रा. मोरेवस्ती, चिखली), सिध्देश्वर गुणवंत झोंबाडे (वय २०, रा. आळंदी), राजेश बळीराम साळवे (वय २०), शंकर सैनाजी आवळे (वय १९) आणि अमर राम पोटभरे (वय २०, सर्व रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चिखली पोलीसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, त्रिवेणीनगर येथील राम मंदिराच्या आवारात उभे असलेले काही तरुण दोरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. यावर चिखली पोलीसांच्या एका पथकाने राम मंदिराच्या आवाराजवळ सापळा रचून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी वापरात येणारा कोयता, कटावणी, कटर आणि मंकी मास्क आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन पाचही आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपी हे यमुनानगर येथील स्वराज बिअर बारवर दरोडा टाकणार होते, अशी कबुली दिली. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.