यमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड

242

निगडी, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान  यमुनानगर येथे काही आंदोलकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची कचरा उचलणाऱ्या ट्रकची तोडफोड केली. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास यमुनानगर येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कचरा उचलणारा एक ट्रक उभा होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही आंदोलकांनी ट्रकवर दगडफेक करुन तोडफोड केली. यामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.