यमुनानगरमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

588

निगडी, दि. २५ (पीसीबी) – निगडीतील यमुनानगर भागातील एका इमारतीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.  मृतदेह आज (बुधवार) दुपारी चारच्या सुमारास  आढळून आला.

श्रीराम मनोहर ढगे (वय ३५, श्री सह्याद्री, यमुनानगर, निगडी)  असे मयत तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मयत श्रीराम हे एकटेच यमुनानगर येथील श्री.सह्याद्री येथील त्यांच्या घरात राहत होते. मागील काही दिवसांपासून त्यांचा नातेवाईकांशी कोणताही संपर्क नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी यमुनानगर मधील त्यांच्या घरी जाऊन त्यांचा शोध घेतला असता, श्रीराम यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरातच आढळला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. निगडी पोलीस तपास करीत आहेत.