यंदा शाहू मराहाज जयंती चिंचवड, संभाजीनगर येथील साई उद्यानात साजरा होणार

32

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कोल्हापूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी केएसबी चौकात साजरी केली जाणारा शाहू महाराज जयंती यंदा संभाजीनगर येथील साई उद्यानात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी दिली.

अनुराधा गोरखे म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कोल्हापूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लोकराजा शाहू महाराज यांची जयंती केसबी चौक येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्यापाशी साजरी केली जात होती. परंतु, यंदा हीच जयंती महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच १० वी व १२ वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाणारे मार्गदर्शन शिबिर संभाजीनगर येथील साई उद्यानात होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (दि. २६) सायंकाळी पाच वाजता होईल.”