…म्हणून शिवेंद्रसिंहराजे समर्थकांची खासदार उदयनराजेंच्या दहीहंडीत घोषणाबाजी   

1703

सातारा, दि. ८ (पीसीबी) – साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांच्या एका आगळ्या वेगळ्या  घोषणाबाजीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोन्ही नेत्यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी आमदारांच्या दहीहंडीत खासदारांच्या नावाची घोषणाबाजी तर खासदारांच्या दहीहंडीत आमदारांच्या नावाच्या घोषणाबाजी करण्यात आली. अशा अनोख्या घोषणाबाजीमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.  

गांधी मैदानावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी दहीहंडी  साजरी केली.   यावेळी ‘मैं हु डॉन’ या गाण्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी ठेका धरला. मात्र,  यावेळी   नेहमीप्रमाणे उदयनमहाराज उदयनमहाराज अशी घोषणाबाजी करण्यात आली. आमदारांच्या दहीहंडीत खासदारांची घोषणा दिल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.

या घोषणाबाजीमुळे  संतप्त झालेल्या आमदार समर्थकांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या शिवछत्रपती दहीहंडी उत्सवात आमदार शिवेंद्रबाबा यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.  यावेळी खासदार उदयनराजेही उपस्थित होते. दरम्यान, दहीहंडीतील या घोषणाबाजी  सातारकरांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत.