‘… म्हणून मेहुण्यांनी जावयावर खुनी हल्ला केला’

63

पिंपरी, दि.१३ (पीसीबी) : ‘तूने मेरे बहन का खून निकाला, हम भी तेरा खून निकालेंगे’, असे म्हणत दोन मेहुण्यांनी जावयाला धारदार वस्तूने मारून गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि. 11) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चिंचेचा मळा, चिखली येथे घडला. राहूल सुरेश खोकर (वय 30, रा. चिंचेचा मळा, चिखली) असे जखमी जावयाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहूल काळूराम गोडाळ, गोलू काळूराम गोडाळ दोघे (रा. चिंचेचा मळा, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फिर्यादी यांचे आई-वडील गावावरून फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी आले होते. फिर्यादी राहूल यांची पत्नी पूजा खोकर यांनी त्यांचे सासू-सासरे आल्याचे पाहून राहूल आणि त्यांच्या आई-वडिलांसोबत वाद घातला. तसेच स्वतः त्यांनी डोक्यात हातोडी मारून घेतली. त्यानंतर पूजा खोकर पोलीस चौकीत गेल्या. राहूल देखील त्यांच्या मागोमाग गेले. मात्र, पूजा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्याचे राहूल यांना समजले. त्यांनी बराच वेळ वाट पाहून घर गाठले. मात्र, पत्नी पूजा घरी आली नसल्याचे समजले. राहूल यांचे सासू-सासरे त्यांच्या घरासमोरच राहत असल्याने त्यांनी सासू-सासर्‍यांकडे याबाबत चौकशी केली.

त्यावेळी आरोपी मेहुणे राहूल आणि गोलू यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच ‘तूने मेरे बहन का खून निकाला हम भी तेरा खून निकालेंगे’, असे म्हणत धारदार वस्तूने गळ्यावर मारून गंभीर दुखापत केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare