…म्हणून मी संघाच्या कार्यक्रमाला गेलो – नितेश राणे

154

सिंधुदूर्ग, दि. ९ (पीसीबी) – मी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता मी ज्या पक्षात आलो आहे. त्या पक्षाला समजून घेणे, त्या पक्षाच्या मातृसंस्थेला समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून मी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, असा खुलासा कणकवली मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी केला आहे.

संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे नितेश राणे सध्या चांगलेचे ट्रोल होत आहेत. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  मला ओळखणारे लोक मला ट्रोल करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. राणे यांनी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुले ही हजेरी मतदारसंघात  चर्चेची विषय ठरली आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना कणकवली मतदारसंघातून  भाजपे उमेदवारी दिली आहे. नितेश राणे याआधी काँग्रेसमधून निवडून आले आहेत. परंतु आता परस्पर विरोधी भूमिका असलेल्या पक्षात  केल्याने नितेश राणे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

 

 

 

WhatsAppShare