म्हणून मला ….पीएचडी करायची आहे’ – चंद्रकांत पाटिल

88

कोल्हापूर, दि.१४ (पीसीबी) – भाजपही देशावरील आपत्ती आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना केली होती, यावर उत्तर प्र्युत्तर देताना ‘मागील पन्नास वर्ष राजकारणात असूनही दहाच्या वर खासदार निवडून आणता नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला. “शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते ५० वर्ष राजकारणात आहेत, तरीही त्यांचा पक्ष दहापेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र राजकारणात ते कायम केंद्रबिंदू असतात. ते कसे काय?’ असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटलांनी टोमणा मारला.

ते पुढे म्हणाले,’ ‘शरद पवार एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपलं म्हणणं कसं काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे’ असे चंद्रकांत पाटील तिरकसपणे म्हणाले.