…म्हणून त्याने मिरचीची पूड टाकून केली दगडाने मारहाण

295

आळंदी, दि. ९ (पीसीबी) – जागेत डाम रोवत असलेल्या व्यक्तीला जागा मालकाने जाब विचारला. यावरून डाम रोवणा-या व्यक्तिने जागा मालकाच्या तोंडावर मिरचीची पूड फेकून दगडाने बेदम मारहाण केली. तसेच तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. हा प्रकार 24 एप्रिल रोजी दुपारी आळंदी येथे घडला.

वासुदेव बाळकृष्‍ण मरकळे (वय 40, रा. मरकळ, ता. खेड) यांनी याबाबत आठ मे रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामदास वामन बनसोडे (रा. गोपाळपुरा, आळंदी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची गोपाळपुरा आळंदी येथे जमीन आहे. तेथे त्यांचे बांधकाम सुरू आहे. 24 एप्रिल रोजी फिर्यादी बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी रामदास फिर्यादी यांच्या मालकीच्या जागेत डाम रोवत होता. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून मिरचीची पूड फेकून मारली. तसेच तिथे पडलेले दगड छातीवर फेकून मारून ‘तुला जिवंत सोडणार नाही तुला बघून घेतो’ अशी धमकी दिली. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

WhatsAppShare