‘…..म्हणून त्याने पत्नीवरच केला खुनी हल्ला’

75

थेरगाव, दि. २७ (पीसीबी) – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेच्या पती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री इंद्रायणी नगर, सदगुरु कॉलनी, थेरगाव येथे घडली.

सुनिता बाळासाहेब जाधव असे जखमी महिलेचे नाव आहे. सुनिता जाधव यांच्या मुलीने याप्रकरणी रविवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळासाहेब किसन जाधव (रा. इंद्रायणी नगर, सद्गुरू कॉलनी, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब जाधव हा फिर्यादीचा पिता आहे. तर जखमी सुनिता जाधव या फिर्यादीच्या आई आहेत. आरोपी बाळासाहेब याला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्याने त्याचा राग मनात धरला. त्यातून सुनीता जाधव यांच्या डोक्यात तीन ते चार वेळा हातोडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात सुनिता जाधव जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर आरोपी बाळासाहेब जाधव पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare