….म्हणून त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या

1

रहाटनी, दि. 13 (पीसीबी) : दारू प्यायला पैसे न दिल्याने सात जणांच्या टोळक्याने कोयते, दांडके हवेत फिरवून एकाला जबरदस्तीने लुटले. तसेच परिसरात दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 12) मध्यरात्री पावणे दोन वाजता रहाटणी परिसरात घडली.

विजय तलवारे, ऋषिकेश सूर्यवंशी, राजू उर्फ राजा पठाण, अजय निकम आणि त्यांचे दोन ते तीन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दशरथ तुकाराम भांडे (वय 34, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी भांडे यांच्याकडे दारू प्यायला पैसे मागितले. पैसे देण्यासाठी भांडे यांनी नकार दिला. त्यावरून आरोपींनी कोयत्यासारखी हत्यारे, लाकडी दांडके हवेत फिरवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या.

‘कोण काय करतंय व कोण मध्ये येतंय ते बघतोच. त्यांना सोडणार नाही. कोणी मध्ये आले तर त्यांना खल्लास करू’ अशी धमकी देत आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर भांडे यांच्या खिशातून आरोपींनी जबरदस्तीने एक हजार रुपये काढून घेतले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare