……. म्हणून त्यांनी केली स्टॉल चालकाला बेदम मारहाण

81

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका स्टॉलवरील वस्तू खरेदी करून त्या स्वस्तात मिळवण्यासाठी चार जणांनी मिळून स्टॉल चालक आणि त्यांच्या एका नातेवाईकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री सात वाजताच्या सुमारास कृष्णानगर पोलीस लाईन बस स्टॉपच्या बाजूला चिंचवड येथे घडली.

गणेश राम शिंदे (वय 24, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षातून (एम एच 12 / जे एस 9343) आलेल्या अनोळखी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश शिंदे यांचा कृष्णानगर पोलीस लाईन बस स्टॉपच्या बाजूला आकुर्डी चिखली रोडवर चिंचवड येथे स्टॉल आहे. शनिवारी रात्री सात वाजताच्या सुमारास आरोपी एका रिक्षातून फिर्यादी यांच्या स्टॉलवर आले. आरोपींनी फिर्यादी यांच्या स्टॉलवरून काही वस्तू खरेदी केल्या. त्या स्वस्तात मिळवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याशी भांडण केले. त्यात फिर्यादी यांच्या डोक्यावर आणि तोंडावर दगड व काचेच्या बाटलीने मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे मेहुणे हरी सूर्यवंशी यांना देखील हाताने मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी हरी सूर्यवंशी यांना शिवीगाळ करत त्यांच्या टेम्पोच्या काचेवर दगड मारून टेम्पोचे नुकसान केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare