…म्हणून तिने उचलले टोकाचे पाऊल; बंधार्‍यात उडी मारून केली आत्महत्या

59

थेरगाव, दि. २८ (पीसीबी) – पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला आणि मारहाणीला कंटाळून महिलेने बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी येथे (दि. 26) सकाळी केजुदेवी बंधारा, ताथवडे येथे उघडकीस आली.

क्रांती संदीप फरताळे (वय 32, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत क्रांती यांचे वडील अनंत किसनराव थोरात (वय 62, रा. खेड शिवापूर, ता. हवेली. मूळ रा. बनकरंजा, ता. केज, जी. बीड) यांनी मंगळवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती संदीप नारायण फरताळे (वय 27, रा. ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप हा फिर्यादी यांची मुलगी क्रांती यांना वारंवार मारहाण करून त्रास देत असे. सततच्या त्रासाला आणि मारहाणीला कंटाळून क्रांती यांनी 23 एप्रिल रोजी घरातून निघून जाऊन केजुदेवी बंधारा, ताथवडे येथे उडी मारून आत्महत्या केली. याबाबत पती संदीपच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान संदीप फरताळे याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. त्यानंतर संदीप यांनी क्रांती यांच्याशी लग्न केले. संदीप आणि क्रांती यांना 13 वर्षांचा मुलगा आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare