मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा …

59

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच जेल मध्ये जाईल, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्याच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादी नेते सडकून टीका करताना दिसत आहेत. मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तरुंगात आहेत. त्यानंतर आता आणखी एक राष्ट्रवादीचा नेता लवकरच तरुंगात जाणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर जोरदार टीका केली. ते माध्यमांशी बोलत होते. “मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा हे सगळ्यांना माहीत आहे,” अशा शब्दात मिटकरींनी कंबोज यांची खिल्ली उडवली आहे.

मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. हा भोंगा जनतेच्या प्रश्नावर, स्त्री अत्याचारावर, जीएसटी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीही वाजत नाही, अशी टीका मिटकरींनी दिली. मोहित कंबोज हा ‘लष्कर-ए-देवेंद्र’ मधील तिसऱ्या फळीतील नेता असल्याची टीका मिटकरींनी केली आहे