मोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडीतील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

350

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने “इ” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडी येथे आज (मंगळवारी) चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली.

मोशी, वडमुखवाडी आणि चोवीसावाडी येथे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामाचे काम चालू आहे. आज (मंगळवारी) वडमुखवाडी परिसरातील कानिफनाथ चौका जवळील रस्त्यालगतचे सुमारे २१६.८१ चौसर फुटाचे एक पत्राशेड निष्कासीत केले. त्याचप्रमाणे मोशी येथील गट नंबर ४५२ मधील सुमारे ७४२.४४ चौसर फुटाचे पत्राशेड उद्ध्वस्त करण्यात आले.