मोशी येथे वारकऱ्यांना कापडी पिशवीचे वाटप

85

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – ह.भ.प वामनमहाराज यादव सेवा संस्था व आमदार महेशदादा लांडगे युवा मंच यांच्या वतीने मोशी येथे वारकऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्लस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. कापडी पिशवीमध्ये वारकऱ्यांना गरजेच्या वस्तू ठेवता येणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धनही होणार आहे. तसेच रस्त्यावर कचराही होणार नाही, यासर्व गोष्टींचा विचार करून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक दिनेश यादव, नंदिप खरात, शाम थोरात, आकाश साळुंखे, किशोर लोंढे, अमित बालघरे, बालाजी पांचाळ, रोहित जगताप, मनोज मोरे आदी उपस्थित होते.