मोशी येथे दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

122

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – मोशी येथे मुक्कामी असलेल्या दिंडीतील दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास घडली.

जनाबाई अनंता साबळे (वय ५५) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय ६०,  दोघी रा. जलालपूर, परळी-वैद्यनाथ, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या वारकरी महिलांची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीच्या दिंडीत सहभागी झालेल्या जनाबाई साबळे आणि सुमनबाई इंगोले या पंढरपूरला जाणार होत्या. मंगळवारी दिंडी मोशी येथाल बो-हाडेवस्तीत मुक्कामी होती. बुधवारी पहाटे त्या दोघी प्रात:विधीला जात होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.