मोशी येथील शिवयोद्धा गृपकडून जीवनावश्यक वस्तूचे वाटप

240

 

मोशी, दि.२९ (पीसीबी) – कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता देशभरात २१ दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे. बंदच्या काळात शहरातील सर्व दुकाने, हाॅटेल व टपर्‍या बंद असल्याने वाटसरू नागरिक व शहरातील हातावर पोट असणारे गोरगरीब यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता शहरातील व परिसरातील गोरगरीब नागरिक, कातकरी व आदिवासी समाज यांना देखील मदत करण्यासाठी विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरस मुळे शासनाने दिलेल्या आदेशाने सर्व सामान्य परिवाराच्या मदतीच्या स्वरूपात मोशी येथे पै.गणेशशेट निवृत्ती सस्ते (अध्यक्ष शिवयोध्दा SY ग्रुप) पै.केदारशेठ गव्हाणे आणि शिवयोद्धा ग्रुप यांच्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून शिजीवनावश्यक वस्तू साखर,गहु, तांदूळ, तेलाचे पुढे, बिस्किटे या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

माझ्या महिला भंगिनिना छोटीशी मदत. सहकार्य तर कायमच रहाणार असे आवाहन अध्यक्ष शिवयोध्दा SY ग्रुप मोशी येथील कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.

यावेळी पै.गणेशशेट निवृत्ती सस्ते अध्यक्ष शिवयोध्दा SY ग्रुप पै.केदारशेठ गव्हाणे आणि शिवयोद्धा ग्रुप मोशी येथील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsAppShare