मोशी पदपथावरील अतिक्रमणांवर मोठी कारवाई

356

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) :- पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फ़त सहाय्यक आयुक्त अण्णा  बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली प्रभाग क्र. २ मधील बो-हाडेवाडी येथील रोड लगतच्या फुटपाथवरील १२ टपऱ्या, मोकळ्या मैदानावरील ४२ झोपड्या व ३२ अनधिकृत पत्राशेड वर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

आज सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, योगेश शेवलकर, राजश्री सातळीकर , अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर, सुपरवायझर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभाग झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.

नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व शेड उभारु नये.तसेच फ़ुटपाथ स्वच्छ  ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. प्रभाग क्र. २ मधील बो-हाडेवाडी येथील सी.एन.जी. पंम्प ते मोशी भाजी मार्केट रोड लगतच्या फुटपाथवरील १२  टपऱ्या , गोल्ड जीम बो-हाडेवाडी शेजारील मोकळ्या मैदानावरील ४२ झोपड्या व ३२ अनधिकृत पत्राशेड वर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.