मोशीत महिलेच्या गळ्यातील मणीमाळ हिस्कावून पसार होणाऱ्या चोराल नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

57

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – महिलेच्या गळ्यातील सोन्याची मणीमाळ हिसका मारुन चोरुन पसार होणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. ही घटना मोशी-आळंदी रस्त्यावरील बेकर्स पॉईंट अॅण्ड केक शॉपच्या समोर सोमवार (दि.४) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.

माधव धनु चव्हाण (वय ३३, रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ५० वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी ५० वर्षीय महिला या सोमवार (दि.४) रात्री सव्वानऊच्या सुमारास मोशी-आळंदी रस्त्यावरील बेकर्स पॉईंट अॅण्ड केक शॉपच्या समोरून पायी जात होत्या. इतक्यात मागून आलेल्या माधव चव्हाण या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची मणीमाळ हिसका मारुन चोरु पळत होता. यावेळी हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या ओंकार गाडे आणि इतर नागरिकांनी पाहिला त्यांनी चोराचा पाठलाग करुन त्याला चोप देत भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलीस उपनिरीक्षक ई.डी.जगदाळे तपास करत आहेत.