मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला

383

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे-नाशिक महामार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांनी रोखून धरला आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर चाकण येथे पोलिसांनी आंदोलकांवर  ड्रोनद्वारे नजर ठेवली आहे.

पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या चाकण परिसरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच चाकण चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलकांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे.