मोशीत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला; चाकणमध्ये आंदोलकांवर ड्रोनद्वारे नजर

96

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान मोशी टोलनाका येथील पुणे-नाशिक महामार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांनी रोखून धरला आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर चाकण येथे पोलिसांनी आंदोलकांवर  ड्रोनद्वारे नजर ठेवली आहे.