मोशीत टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; टेम्पो चालकाला अटक

401

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. २७) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोशी येथील बोराडेवाडी चौकात घडला. या प्रकरणी टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.

राजेंद्र सदाशिव चव्हाण असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरूणाचे नाव आहे. तर टम्पो चालक विलास गंगाराम कुसाळकर (रा. जाधववाडी, चिखली) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भरत मोहिते (रा. बोराडेवाडी, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा काल (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून बोराडेवाडी चौकातून जात होता. यावेळी भरधाव आलेल्या टेम्पो चालक कुसाळकर यांच्या टेम्पोची राजेंद्रच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात तो जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.