मोशीत घरासमोरील वाहने नीट लावण्याच्या कारणावरुन मायलेकाला दगडाने मारहाण

112

मोशी, दि. १५ (पीसीबी) – घरासमोरील वाहने नीट लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील चौघाजणांनी मिळून मायलेकाला डोक्यात आणि हातावर दगड मारुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार (दि.१३) रात्री साडेआठच्या सुमारास मोशी लक्ष्मीनगर येथे घडली.

याप्रकरणी रोशन राजु सावंत (वय २७, रा. लक्ष्मीनगर मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश कातळे (वय २७), निवृत्ती कातळे (वय २४), पदमा कातळे (वय ४५) आणि मेघराज मोहिते (वय २५, सर्व रा. लक्ष्मीनगर, मोशी) या चौघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोशन आणि चौघे आरोपी हे एकाच परिसरात राहतात. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरासमोरील वाहने नीट लावण्याच्या कारणावरुन त्याच्यात वाद झाला. यावर आरोपींनी रोशन आणि त्याच्या आईला शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केली. या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.