मोशीत खोली खाली करण्याच्या कारणावरुन दाम्पत्याला लोखंडी गजाने मारहाण

102

मोशी, दि. १४ (पीसीबी) – खोली खाली करण्याच्या वादातून दोघांनी मिळून एका दाम्पत्याला शिवीगाळ करत लोखंडी गजाने जबर मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.१२) मोशी तुपेवस्तीतील माया निवास येथे घडली.

याप्रकरणी दत्तात्रय दगडु पाचंगे (वय ३७, रा. तुपेवस्ती गणेशनगर मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राम सुरेश अवचिते (वय ३५, रा. माया निवास, तुपेवस्ती गणेशनगर मोशी) आणि शहा (वय ३५) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय हे आरोपी राम अवचिते यांच्या मालकिच्या मोशी तुपेवस्तीतील माया निवास येथील भाड्याच्या खोलीत राहतात. रविवारी खोली खाली करण्याच्या कारणावरुन आरोपी राम आणि शहा या दोघांचा दत्तात्रयसोबत वाद झाला. यामुळे आरोपी राम आणि शहा या दोघांनी दत्तात्रय याला शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी दत्तात्रय याची पत्नीने मध्यस्ती केली असता आरोपींनी तिला देखील हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.