मोशीत एसएनबीपीच्या संस्थापकाकडून लेखापाल महिलेचा विनयभंग

99

भोसरी, दि. १ (पीसीबी) – मोशीतील एसएनबीपी (सुभद्रास नर्सरी अॅण्ड भोसले पब्लीक स्कुल्स) या शहरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या संस्थापकाने त्यांच्या कार्यालयातील एका लेखापाल महिलेचा बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.२० जुलै) मोशीतील रिव्हर रेसिडेन्सी येथे असलेल्या एसएनबीपीच्या शाळेत घडली.