मोशीत एसएनबीपीच्या संस्थापकाकडून लेखापाल महिलेचा विनयभंग

1540

भोसरी, दि. १ (पीसीबी) – मोशीतील एसएनबीपी (सुभद्रास नर्सरी अॅण्ड भोसले पब्लीक स्कुल्स) या शहरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या संस्थापकाने त्यांच्या कार्यालयातील एका लेखापाल महिलेला बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.२० जुलै) मोशीतील रिव्हर रेसिडेन्सी येथे असलेल्या एसएनबीपीच्या शाळेत घडली.

याप्रकरणी पिडीत ३९ वर्षीय लेखापाल महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. निगडी पोलिसांनी त्यानुसार एसएनबीपी या शिक्षण संस्थेचे संस्थापक दशरथ भोसले (रा. येरवडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीतील रिव्हर रेसिडेन्सी येथे एसएनबीपी या शिक्षण संस्थेची एक शाळा आहे. या ठिकाणी पिडीत ३९ वर्षीय महिला लेखापाल पदावर कार्यरत आहे. शुक्रवार (दि.२० जुलै) संस्थेचे संस्थापक दशरथ भोसले यांनी पिडीत महिलेला अकाउंटच्या कामासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. महिला कार्यालयात गेली असता भोसले यांनी तिचा विनयभंग केला. पिडीत महिलेने याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.