मोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू

1372

मोशी, दि. १७ (पीसीबी) – नवीन फ्लॅट बघण्यासाठी आई वडिलांसोबत गेलेल्या एका आठ वर्षीय मुलाचा सोसायटीतील तलावात पडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १५)  बोऱ्हाडेवाडी मोशीतील साई फॉर्च्युन येथे घडली.

तनिष्क अर्जुन कोल्हे (वय ८, रा. रेणुका अपार्टमेंट, समर्थ कॉलनी, दळवीनगर, चिंचवड) असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कोल्हे दाम्पत्य हे त्यांचा मुलगा तनिष्कला घेऊन बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील साई फॉर्च्युन येथे नवीन फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी आई-वडील फ्लॅट बघण्यात गुंत असताना. सोसायटीच्या आवारात मोठ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी असलेल्या जलतरण तलावा जवळ तनिष्क गेला. या दोन्ही तलावांमध्ये एकच भिंतीचे विभाजन आहे. त्या भिंतीवरून जात असताना तनिष्क अचानक मोठ्यांच्या पोहण्याच्या तलावात पडला. आई-वडिलांचे फ्लॅट बघून झाल्यावर तनिष्कची शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी तो तलावाच्या तळाशी अढळून आला. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या दुखद घटनेमुळे चिंचवड परिसरात शोककळा पसरली आहे.