मोशीत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

84

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (सोमवार) पहाटे सहाच्या सुमारास मोशी-देहू रस्त्यावरील श्री हॉस्पिटल जवळ घडली. मृत तरुणाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती मोशी-देहू या रस्त्यावर श्री हॉस्पिटल जवळ जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मात्र मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. त्याचे वय अंदाजे २८ वर्ष सांगितलेजात आहे. एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.