मोशीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

111

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – रस्त्याने पायी चाललेल्या एका इसमाला भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना भोसरीकडून मोशीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काजळे पेट्रोल पंपासमोर घडली.

विनायक मानिक जिगळे (वय ४०, रा. कल्हाळा, नांदेड) असे मयत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी भानुसादस यशवंतराव क्षीरसागर (वय ६२) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.५ जुलै) रात्री बाराच्या सुमारास मयत विनायक हे भोसरीकडून मोशीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काजळे पेट्रोल पंपासमोर पायी चालले होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने विनायक यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होवून विनायक यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलिस आरोपी कारचालकाचा शोध घेत आहेत.