मोरवाडीत दुचाकीस्वार चोरट्यांनी कारचालकाला धमकावून कार पळवली

366

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – दुचाकीवरुन आलेल्या  दोघा चोरट्यांनी कारमालकाला धमकावून त्यांच्या ताब्यातील कार, मोबाई आणि पाकीट असा एकूण ६ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल घेऊन लंपास झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. १३) रात्री पावने अकराच्या सुमारास मोरवाडी येथील तुकाराम मालुसरे रोड येथे घडली.

याप्रकरणी कार मालक विठ्ठल मिरगाळे (वय २१, रा अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल मिरगाळे हे बुधवारी रात्री पावने अकराच्या सुमारास मोरवाडी येथील तुकाराम मालुसरे रोड येथून आपल्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच/१४/जीडी/४९१०)  हिने जात होते. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांची कार अडवली. तसेच त्यांना धमकावून कारच्या खाली खेचले. चोरट्यांनी त्यांच्या जवळील दोन हजार रुपये किमतीचा एक मोबाई आणि पाकीट ज्या मध्ये म्हत्वाची कागदपत्रे होते ते असा एकूण ६ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल हिसकावून फरार झाले.  विठ्ठल यांनी पिंपरी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पवन पाटील तपास करत आहेत.