मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात उपोषण

11

चिंचवडगाव, दि. १३ (पीसीबी) – संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर बंद असे काळे चित्र उभे केले आहे. या निंदणीय निर्णयाविरोधात आणि जनतेची श्रद्धास्थाने असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत या मागणीकरिता श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज समाधी मंदीर परिसरात भारतीय जनता पार्टी चिंचवड-किवळे मंडलाच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, महापौर माई ढोरे, भागवताचार्य गवळी महाराज व शहर सरचिटणीस नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज , मोरया व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष खंडाईत, चिंचवडगावातील हनुमान भजनी मंडळ या संस्थांनी या लाक्षणिक उपोषणास पाठिंबा दिला तसेच संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे, ब’प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, कैलास बारणे, नगरसेविका करुणा चिंचवडे, ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, महीला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे यांच्यासह विजय सिनकर, काळूराम बारणे, शेखर चिंचवडे, धनंजय जगताप, प्रशांत आगज्ञान, सनी बारणे, रविंद्र प्रभुणे, प्रदिप सायकर, मिथुन बोरगांव, स्वप्निल देव, अनिकेत पायगुडे, केदार बावळे, वरद देव, सुप्रिया पाटील, दिपाली धनोकार, कुंदा भिसे, रंजना चिंचवडे, पल्लवी वाल्हेकर, मनीषा चिंचवडे, शोभा भराडे, राधिका बोर्लीकर, हनुमान भजनी मंडळांचे बेलसरे गुरुजी, घुले महाराज यांच्यासह पक्षाचे मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या उपोषणात सहभागी झाले होते.

आंदोलन यशस्वी होण्यासाठी मंडलाचे अध्यक्ष व संयोजक योगेश चिंचवडे, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजयुमोचे अजित कुलथे, महेश मिरजकर, प्रदीप पटेल, तेजस खेडकर यांच्यासह मंडलातील कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले.

WhatsAppShare