मोरया गोसावी व्दारयात्रेचे चिंचवडमधील मंगलमुर्ती वाड्यातून प्रस्थान

228

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज (रविवारी) मोरया गोसावी प्राप्त श्री मंगलमूर्तींच्या पालखीचे आज चिंचवड येथून प्रस्थान झाले.  यंदा तिथीक्षय असल्यामुळे ही व्दारयात्रा तीन दिवस चालणार आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदा ते चतुर्थी, असे चार दिवस महासाधू मोरया गोसावी यांची व्दारयात्रा काढली जाते. या चार दिवसांत मोरया गोसावी देवस्थानच्या चार व्दाराला असणाऱ्या देवींच्या स्थानाला; तसेच श्री भैरोबाच्या स्थानाला व्दारयात्रा काढली जाते.

दरम्यान, आज (रविवारी) पालखी पिंपरीतील श्री मांजराई देवी (पुर्वव्दार), त्यानंतर उद्या (सोमवारी) वाकड येथील श्री आसराई देवी (दक्षिणव्दार) आणि १४ ऑगस्टला सकाळी रावेतेमधील श्री ओझराई देवी (पश्चिमव्दार) येथून दुपारी आकुर्डीतील श्री मुक्ताई देवी, असा या व्दारयात्रेचे कार्यक्रम असणार आहेत.

प्रत्येक दिवशी रोज सकाळी नऊ वाजता व्दारयात्रेचे मंगलमुर्ती वाड्यातून प्रस्थान होणार असून घाटावार दर्शन, व्दारदेवतेची पूजा, गोंधळ, जोगावा, परत येताना घाटावर पदांची समाप्ती त्यानंतर मंगलमुर्ती वाड्यात सर्वांना प्रसाद, असा व्दारयात्रेचा कार्यक्रम असणार आहे.