मोबाइल हरवलाय? गुगलवरून ‘असा’ घ्या शोध

272

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – स्मार्टफोन्स रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. अशा परिस्थितीत फोन हरवला किंवा चोरी झाला तर तारांबळ उडते, कधी कधी तर महत्वाची कामेही अडून राहतात. पण, मोबाईल हरवला तरीही गुगलच्या सहाय्याने त्यांचा थांगपत्ता लावता येतो.

जी-मेल वर येणारे मेल वगैरे गोष्टी पाहण्यासाठी अॅंड्रॉईड फोनवर गुगल अकाउंट सुरू करावे लागते. या अकाउंटच्या सहाय्याने हरवलेला फोन सध्या कुठे आहे याचे लाइव्ह लोकेशनह मिळू शकते. फोन शोधण्यासाठी हरवल्यानंतर लगेचच एक सोपी प्रक्रिया पुर्ण करावी लागते.

फोन शोधण्यासाठी ‘हे’ करा

– दुसऱ्या स्मार्टफोन किंवा कंप्युटर, लॅपटॉप मधून गूगल अकाउंटवरून ‘find my phone’ हा पर्याय निवडावा.

– मग हरवलेल्या फोनवर सुरू असलेल्या गुगल अकाउंटने लॉग इन करावे. यानंतर हरवलेल्या फोनचं लोकेशन दिसू लागेल. या लोकेशनच्या सहाय्याने फोनपर्यंत पोहचता येईल.

-लोकेशन दिसू लागल्यावर फोन सायलेंट असेल तरी मोठ्याने वाजवण्याचा पर्याय निवडता येतो. विशेष म्हणजे, यासाठी मोबाईलमध्ये सिम कार्ड असण्याचीही आवश्यकता नाही.

प्रायव्हसीची काळजी

स्मार्टफोनमध्ये बरेचदा खाजगी गोष्टी असतात. फोन हरवला तरी तो परत मिळेपर्यंत त्यातील खासगी माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यासाठी ‘find my phone’ हा पर्याय निवडल्यानंतर ‘Enable lock & erase’ हा पर्याय निवडावा. यामुळे एखादा पिन किंवा पासवर्ड टाकून फोन लॉक करता येतो. एवढेच नाही, तर ज्याला फोन सापडला आहे त्याला तो परत करणे सोपे जावे यासाठी एखादा मेसेज किंवा फोन नंबरही लिहीता येतो. हा मेसेज मोबाईलच्या स्क्रिनवर दिसतो. शिवाय, ‘इरेझ’ हा पर्याय निवडला तर मोबाइलच्या इंटरनल मेमरीमध्ये असणारा सगळा डाटा डिलीट होतो.