मोदी पाकिस्तानातून परतले, पठाणकोटचा हल्ला झाला; मी परतल्यानंतर शांती संदेश आला –  नवज्योत सिंह सिध्दू

309

जयपूर, दि. ३ (पीसीबी) –  पाकिस्तानात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तान  या दोन देशातील संबंध सुधारतील, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिध्दू यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला  मी उपस्थिती  लावल्यानंतर  ही अपेक्षा आणखी मजबूत झाली आहे, असेही सिध्दू यांनी म्हटले आहे.

राजस्थानातील अजमेरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिद्धू बोलत होते.  इम्रान खान  यांच्याकडून आलेल्या संदेशात म्हटले आहे की, आम्ही उभय देशांच्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी उत्सुक आहोत. आपण या दिशेने एक पाऊल पुढे टाकला, तर ते (पाकिस्तान) दोन पाऊल पुढे टाकतील, असा दावा सिध्दू यांनी केला .

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानहून परतले तर कारगिलचे युद्ध झाले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानहून परतले तर पठाणकोटचा दहशतवादी हल्ला झाला. मात्र, मी परतल्यानंतर झालेल्या वादामुळे माझ्या मित्राने (इम्रान खान) सांगितले की आम्हाला शांती हवी आहे. यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकले, तर आम्ही दोन पाऊलं पुढे टाकू, असे सिध्दू  म्हणाले.