देश,दि.०१(पीसीबी) – देशातील वीज संकटावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विजप्रश्नावर अपयशासाठी कोणाला जबाबदार धरणार असा सवाल केला. या वीज संकटासाठी पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राज्य सरकार की देशातील जनतेला जबाबदार धरणार, असा प्रश्न करत राहुल गांधींनी टोला लगावला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधानांच्या भूतकाळातील भाषणाची व्हिडिओ क्लिप पोस्ट करत त्यांनी लिहिले की ‘पंतप्रधानांची आश्वासने आणि हेतू नेहमीच खोडून काढले गेले आहेत. मोदी जी, या वीज संकटात तुमच्या अपयशासाठी तुम्ही कोणाला दोष देणार? नेहरू जी की राज्य सरकारांना की जनतेला?’
प्रधानमंत्री जी के ‘वादों’ और ‘इरादों’ के बीच का तार तो हमेशा से ही कटा था।
मोदी जी, इस बिजली संकट में आप अपनी नाकामी के लिए किसे दोष देंगे?
नेहरू जी को? राज्य सरकारों को? या फिर जनता को ही? pic.twitter.com/fNDMz6rMt1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 30, 2022
2015 मध्ये देशभरात 24 तास वीज पुरवण्याचे वचन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मागील भाषणे दाखवणारा व्हिडिओ देखील त्यांनी टॅग केला आणि 2017 मध्ये दावा केला की, आता कोणीही वीज संकट किंवा कोळसा संकटाच्या बातम्या ऐकल्या नाहीत. राहुल गांधींनी पोस्ट केलेल्या सुमारे एक मिनिटाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये सध्याच्या वीज संकटाच्या बातम्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे त्यामध्ये एका व्यावसायिकाने सांगितले आहे की तो दिवसभराच्या कामानंतर देखील झोपू शकत नाही.
देशातील अनेक राज्यांतील वीज कपातीवरून विरोधी पक्ष काँग्रेसने शुक्रवारी भाजप सरकारवर निशाणा साधला होता. केंद्र सरकारच्यागलथान कारभारामुळे हे कृत्रिम संकट आल्याचा कॉंग्रेसकडून भाजप सरकारवर आरोप करण्यात आले. मोदी सरकार देशभरातील वीज प्रकल्पांना कोळशाच्या वितरणासाठी लॉजिस्टिक सपोर्ट देत नसल्याचा आरोप पक्षाने केला असून त्यामुळे संकट निर्माण झाले आहे, असे सांगण्यात आले.