मोदी असोत की वढेरा भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे – राहुल गांधी

136

चेन्नई, दि. १३ (पीसीबी) – रॉबर्ट वढेरा यांची गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे, ते तपासात सहकार्य करत आहेत.  तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी राफेल करारात काय केले आहे. हे संपूर्ण  देशाला माहित आहे. मोदी असोत की वढेरा भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे, अशी  मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  आज (बुधवार) येथे केली.

राहुल गांधी यांनी चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींवर तोफ डागली.

रॉबर्ट वढेरा यांच्यावर तुम्हाला कारवाई करायची आहे. तुमच्याकडे सर्व साधनेही आहेत. पण कधी पंतप्रधान स्वत: राफेलवर एकतरी शब्द बोलले आहेत का? रॉबर्ट वढेरा तपासात सहकार्य करत आहेत. पण संपूर्ण देश जाणतो की पंतप्रधान मोदींनी राफेल करारात काय केले आहे. तरीही त्यांनी मौन बाळगले आहे.

राफेल आणि देसॉल्टच्या कागदपत्रांमध्ये थेट पंतप्रधानांचे नाव आले आहे. त्यांची चौकशी झालीच पाहिजे. रॉबर्ट वढेरा यांची चौकशी केली जात असून ते तपासात सहकार्य करत आहेत. मोदींचे नाव राफेलच्या कागदपत्रात आहेत. त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, असे राहुल म्हणाले.