मोदीजी मर्द बना आणि यूपीएचे यश स्वीकारा – दिग्विजय सिंह

266

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – मोदीजी यूपीएच्या काळातील जीडीपीच्या वाढीचा दर पाहून घाबरले आहात काय ? किती दिवस आपले अपयश लपवत राहणार ? मोदीजी मर्द बना आणि यूपीएचे यश स्वीकार करा, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.  

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील जीडीपीच्या वाढीवरून ट्विट करत सिंह यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.  त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जनतेला सर्व माहीत आहे. यूपीएचे यश स्वीकारा. किती दिवस आपल्या जुमलेबाजीने लोकांची दिशाभूल करणार. सत्य एक ना एक दिवस समोर येईल.

देशाच्या आर्थिक विकासाचा दर यूपीएच्या कार्यकाळात २००६-०७ मध्ये १०.०८ टक्के होता. उदारीकरणानंतरचा हा वाढीचा सर्वोच्च दर होता. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने नियुक्ती केलेल्या  ‘कमिटी ऑफ रिअल सेक्टर स्टॅटिक्स’ने मागील २००४-०५ च्या आधारावर ही आकडेवारी जाहीर केली होती. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक वाढीचा दर हा १०.०२ टक्के इतका १९८८-८९ मध्ये होता. त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी होते, याचीही आठवण सिंह यांनी करून दिली.