मोदींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे

71

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द काढल्याप्रकरणी निलंबित केलेले काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर यांचे निलंबन रद्द केले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान मणिशकंर अय्यर यांनी मोदीविषयी बोलताना ‘नीच प्रवृत्तीचा माणूस’ असे शब्द वापरले होते.