मोदींना ‘चौकीदार चोर है’ म्हणणे राहुल गांधींना भोवणार; सर्वोच्च न्यायालयाने मागविला खुलासा     

80

नवी दिल्ली , दि. १५ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ‘चौकीदार चोर है’ असा प्रचार करणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण ‘चौकीदार चोर है’ या विधानाचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश  सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिले आहेत.

भाजपा खासदार मीनाक्षी लेखींच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. राफेल करारात अंबानींच्या कंपनीसोबत करार करण्यात पंतप्रधान मोदींचा हस्तक्षेप होता.  हे सर्व नियमबाह्य आणि हेतुपूर्वक पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप   राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर ‘ चौकीदार ही चोर है’ अशी टॅगलाईन राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चालवली आहे. त्यानंतर काँग्रेसने सोशल मीडियात हे कॅम्पेन सुरू केले.

दरम्यान, ‘न्यायालयानेही कबुल केले आहे की चौकीदार चौर आहे’ असे काही दिवसांपुर्वी राहुल गांधी यांनी म्हटले होते.  यावर  ‘चौकीदार चोर है’  हे विधान सर्वोच्च न्यायालयाने केलेले नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने    ‘चौकीदार चोर है, या विधानाचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश  राहुल गांधी यांना दिले आहेत.