मोदींना अशिक्षित म्हणणारे संजय निरूपम मानसिक रोगी – शायना एनसी

222

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यावर अशिक्षित, अडाणी अशा शब्दांचा वापर करून टीका  करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांनी मानसिक रोगी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून   निरुपम यांच्यावर निशाणा साधला.  

मानसिक रोगी संजय निरूपम यांनी पुन्हा एकदा असभ्य टिप्पणी केली आहे. १२५ कोटी भारतीयांनी मोदींना निवडून दिले आहे.  ते अशिक्षित आणि अडाणी नाहीत, याचा कदाचीत निरूपम यांना विसर पडला असावा, असे शायना एनसी यांनी म्हटले आहे. तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही निरूपम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. सभ्य माणसाला न शोभणारे हे वक्तव्य आहे, असे ते म्हणाले .

दरम्यान, पंतप्रधान मोदींवरील लघु चित्रपट मुलांना शाळेत दाखवला जाणार आहे. मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करून निरूपम यांनी जी मुले शाळा, महाविद्यालयात शिकत आहेत. त्यांना मोदींसारख्या अशिक्षित, अडाणी व्यक्तीबाबत जाणून घेऊन काय मिळणार आहे ? ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे की आजही आमच्या देशातील नागरिक आणि मुलांना आमच्या पंतप्रधानांकडे कोणती पदवी आहे, याचीच माहीत नाही, असे  संजय निरूपम म्हणाले  होते.