मोदींची हवा नसल्यानेच मोहिते, विखेंनी भाजप प्रवेश टाळला; नवाब मलिकांचा टोला

39

मुंबई, दि. १७  (पीसीबी) – देशात मोदींची सत्ता येत नाही याची शंका आल्यानेच विजयसिंह मोहिते-पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपामध्ये जाणे टाळले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.आज अकलूज येथे मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर दिसले परंतू, त्यांनी भाजपा प्रवेश केला नाही. तीच परिस्थिती नगरच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांची आहे. या दोन्ही नेत्यांना आपल्या जागा निवडून येतील का? याबाबत विश्वास नाही असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.