मोदींंची पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; संजय राऊत भडकले

127

मुंबई,दि.२१(पीसीबी) – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींची पुन्हा छत्रपती शिवाजी पुन्हा तुलना करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष आहेत. शिवरायांचा राजकारणासाठी वापर चुकीचा आहे. असा अपमान सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात शिवसेनेवर ज्यांनी तावातावानं टीका केली. ते यावर काय भूमिका घेणार याची मी वाट बघतोय, अशा शब्दात राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्यावर टीका केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता हळूहळू सुरु होत आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी, भाजपा आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांमध्ये दिल्लीत राजकीय लढत बघायला मिळणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच तान्हाजी सिनेमातील एक प्रसंग मार्फ करून व्हायरल करण्यात आला आहे. या प्रसंगात शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

WhatsAppShare