मोठी बातमी! ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा; आता पुढचा मुख्यमंत्री कोण?

52

कर्नाटक, दि.२६ (पीसीबी) : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड गदारोळ झाला आहे. आज म्हणजे सोमवारी बी.एस. येदियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकारनं 2 वर्ष पुर्ण केल्याच्या दिवशीच येदियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

‘आता मला कर्नाटकच्या लोकांसाठी खुप काम करायचे आहे. आपणा सर्वांना मेहनत घेऊन काम करायला हवं. मी नेहमी अग्नीपरीक्षेतून गेलो आहे’, असं येदियुरप्पा यांनी राजीनामा देताना म्हंटल आहे. गेल्या काही दिवसांपासुन कर्नाटकमध्ये येदियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू होती. येदियुरप्पा यांनी नवी दिल्ली जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर पासुनच येदियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. आज अखेर येदियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता कर्नाटकचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsAppShare