मोठी बातमी: भाजपचे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

139

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : भाजपाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी व टाटा मोटर्स एम्पलॅाईज युनियनचे उपाध्यक्ष नयन पालांडे यांनी आज काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुष्पगुच्छ व काँग्रेस उपरणे देऊन त्यांचे स्वागत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. खराळवाडी पिंपरी येथील हिंद कामगार संघटनेच्या हॅाल मध्ये झालेल्या या प्रवेश कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे माजी सभापती रवी खन्ना, माजी नगरसेवक सदगुरू कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेसचे नेते संजीव झोपे, माऊली मलशेट्टी, आबा खराडे, अथर्व पालांडे, ऋषीकेश पालांडे, अथर्व घरत आदी उपस्थित होते.

“येणा-या काळात काँग्रेस पक्षाची सत्ता महापालिकेच स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कैलास कदम यांच्या नियुक्तीने काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे”. नयन पालांडे म्हणाले, “काँग्रेस पक्षात आज प्रवेश करत आहे. आगामी काळात कैलास कदमांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे”, असं जगदीश शेट्टी यांनी सांगितलं.

WhatsAppShare