मोठी बातमी! पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार बिनविरोध..

182

पुणे , दि. ८ (पीसीबी) -शेतकरी कृती समितीचे नेते सतीशराव काकडे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे.

पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून शेतकरी कृती समितीचे नेते सतीशराव काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अजित पवार यांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली.